Cosmos Bank Recruitment 2024

Cosmos Bank Recruitment 2024 : कॉसमॉस बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Manager, Assistant Manager, Junior Officer” पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे, तर मुलाखतीला जाताना अर्जदाराने अर्ज न्यायचा आहे. मुलाखत 29, 30, 31 जुलै 2024 रोजी घेतल्या जातील.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is COSMOS Bank :
कॉसमॉस बँक ही भारत देशातील मोठ्या आणि सर्वात जुन्या सहकारी बँकांपैकी एक बँक आहे. सन १९०६ साली महाराष्ट्रातील पुणे शहरात कॉसमॉस बँकैची स्थापना झाली. ११८ वर्ष जुन्या या बँकेने उत्तरोत्तर प्रगती करून आपला व्यवसाय भारतातील इतर राज्यांमध्ये देखील विस्तारला आहे. आजच्या घडीला एकूण ०७ राज्यात कॉसमॉस बँकेच्या शाखा उपलब्ध आहेत. आज सुमारे १४० शाखा कॉसमॉस बँकेच्या संपूर्ण भारतभर कार्यरत आहेत.
