GSRLM Goa Bharti 2024
GSRLM Goa Bharti 2024 : गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Manager, Accountant, Assistant, Data Entry Operator” पदासाठी एकूण 29 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाईल. 01 जुलै 2024 पासून 11 जुलै 2024 पर्यंत विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जातील.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the GSRLM :
गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान हे राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियानाचा भाग आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मांत्रालयच्या अंतर्गत हे अभियान चालवले जाते. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावेत आणि ग्रामीण क्षेत्रांचा विकास व्हावा या हेतूने २०११ साली तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी अभियान सुरु केले. गोवा राज्यात याच अभियाना अंतर्गत भरती निघाली आहे.