IBPS Clerk Notification 2024
IBPS Clerk Notification 2024 : IBPS यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Clerk” पदासाठी एकूण 6128 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 28 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
IBPS मार्फत जाहीर केलेल्या सरकारी बँक क्लर्क भरती 2024 साठीची अर्जाची शेवटची तारीख पुढे ढकलली गेली आहे. आता नवीन अर्जाची शेवटची तारीख 28 जुलै 2024 अशी आहे. अजूनही कोणाचे अर्ज राहिले असतील तर त्यांनी या तारखेपर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the IBPS :
Institute of Banking Personnel Selection ही सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये अधिकारी, कलर्क तसेच विविध पदांसाठी निवड करण्याचे काम करते. निवडप्रक्रियेमध्ये परीक्षा आणि मुलाखत असे काही टप्पे बनवलेले असतात. देशातील लाखो इच्छुक विद्यार्थ्यांचे पारदर्शकतेने परीक्षा आणि मुलाखत घेऊन सगळी प्रक्रिया सुसज्य ठेवन्यासाचे काम IBPS करत आहे. १९७५ साली स्थापन झालेल्या या संस्थेने नियमितपणे परीक्षा आणि मुलाखत घेऊन सरकारी कर्मचारी निवड प्रक्रियेमध्ये हातभार लावला आहे.