Madras High Court Recruitment 2024
Madras High Court Recruitment 2024 : मद्रास हाय कोर्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Interpreter” पदासाठी एकूण 08 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Madras High Court :
मद्रास हाय कोर्ट भारतातील २५ हाय कोर्ट पैकी एक कोर्ट आहे. कोलकाता येथील कलकत्ता हाय कोर्ट आणि मुंबई शहरातील मुंबई हाय कोर्ट नंतर तिसरे सर्वात जुने हाय कोर्ट म्हणून मद्रास हाय कोर्ट ओळखले जाते. ब्रिटिश काळात म्हणजेच १८६२ मध्ये मद्रास हाय कोर्ट ची स्थापना करण्यात आली. तामिळनाडू राज्यच्या चेन्नई शहरात हे हाय कोर्ट आहे. अश्या या महत्वाच्या हाय कोर्टमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.