AIASL Jaipur Recruitment 2024
AIASL Jaipur Recruitment 2024 : एआय एअरपोर्ट सर्विस लिमिटेड जयपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Jr. Officer, Customer Service Executive, Jr. Customer Service Executive, Ramp Service Executive, Ramp Driver, Handyman“ पदांसाठी एकूण 145 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाईल. 08, 09, 10, 11 मे 2024 रोजी मुलाखत घेतली जाईल. अधिक माहिती खाली दिलेल्या मजकुरामध्ये लिहिलेली आहे.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is AIASL :
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड [ AIASL ] ही कंपनी एअर इंडिया या कंपनीच्या अंतर्गत काम करते. एअर इंडियाची सब्सिडरी कंपनी म्हणून ओळखली जाते. सन २००३ साली एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची स्थपणा करण्यात आली. एअरपोर्ट वर केल्या जाणाऱ्या सगळ्या कामांमध्ये या कंपनीचे योगदान असते, अगदी कार्गो हँडलिंग पासून पॅसेंजर हँडलिंग पर्यंत सगळीच कामे या कंपनीद्वारे केली जातात. एअर इंडिया या एअरलाईनच्या सुरळीत चालण्यामागे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा देखील तेवढाच हात आहे.
