MahaVitaran Vidyut Sahayak Bharti
MahaVitaran Vidyut Sahayak Bharti : महावितरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विद्युत सहाय्यक” पदांसाठी एकूण 5347 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 अशी आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
महावितरणची 5347 जागांची विद्युत सहाय्यक पदासाठीच्या जाहिरातीला अर्ज करण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. आता अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख 20 जून 2024 आहे. सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, तसेच अर्ज करण्याची तारीख पुढे गेली असल्यामुळे शक्यता आहे की परीक्षेची तारीख देखील पुढे जाऊ शकते. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा. या जाहिरातीबद्दल नवीन माहिती हाती लागताच तुम्हाला पुढील अपडेट दिला जाईल.
What is MahaVitaran :
महावितरण ही महाराष्ट्र सरकारची वीज निर्यात करणारी संस्था आहे. महाराष्ट्र राज्यात घराघरात वीज पुरवठा करण्याचे काम महावितरण करत असते. २००५ साली महावितरण , महानिर्मिती , महापारेषण या ३ कंपन्या अस्तित्वात आल्या. वीज निर्मितीचे काम महानिर्मिती करते, महानिर्मिती केंद्रापासून वीज महावितरण पर्यंत पोचवण्याचे काम महापारेषण करते, आणि सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये, उद्योग धंद्यांना वीज पुरवण्याचे काम महावैतारण करते.
MahaVitaran Vidyut Sahayak Bharti
महावितरण भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 5347
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
विद्युत सहाय्यक | 5347 |