Mumbai Central Railway Recruitment 2024
Mumbai Central Railway Recruitment 2024 : मध्य रेल्वे मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Teacher“ पदांसाठी एकूण 16 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी 03 दिवस मुलाखत घेतली जाईल. 07 मे , 08 मे आणि 09 मे 2024 रोजी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीचा वेळ सकाळी १० ते दुपारी ०१ वाजेपर्यंतचा आहे. सर्वानी वेळेच्या आधी मुलाखतीच्या ठिकाणी हजर राहावे. मुलाखत कोणत्या ठिकाणी होईल याची माहिती खाली दिलेल्या मजकुरामध्ये दिलेली आहे.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Central Railway :
सेंट्रल रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या अनेक विभागांपैकी महत्वाचा विभाग आहे. सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय मुंबई शहरात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सेंट्रल रेल्वेचे मुख्यालय आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी सन १८५३ साली मुंबई ते ठाणे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथूनच धावली होती. भारतीय रेल्वे विभाग हा जगातील ४थ्या क्रमांकाचा मोठा विभाग आहे.
