AIASL Recruitment 2024
AIASL Recruitment 2024 : एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, पुणे [ AIASL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर, ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह, रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह, युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर, हॅन्डीमॅन, हॅन्डीवूमन” पदांसाठी एकूण २४७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. येथे नमूद केलेल्या विविध पदांसाठी वेगवेळ्या दिवशी थेट मुलाखत आयोजित केली आहे. १५ एप्रिल २०२४ ते २० एप्रिल २०२४ पर्यंत रोज विविध पदांसाठी मुलाखत घेतली जाईल. तरी आपण आपल्याला हव्या त्या पदानुसार कोणत्या दिवशी आपली मुलाखत आहे याची नोंद घ्यावी.
या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड [ AIASL ] ही कंपनी एअर इंडिया या कंपनीच्या अंतर्गत काम करते. एअर इंडियाची सब्सिडरी कंपनी म्हणून ओळखली जाते. सन २००३ साली एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची स्थपणा करण्यात आली. एअरपोर्ट वर केल्या जाणाऱ्या सगळ्या कामांमध्ये या कंपनीचे योगदान असते, अगदी कार्गो हँडलिंग पासून पॅसेंजर हँडलिंग पर्यंत सगळीच कामे या कंपनीद्वारे केली जातात. एअर इंडिया या एअरलाईनच्या सुरळीत चालण्यामागे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा देखील तेवढाच हात आहे.
AIASL Recruitment 2024
Air India Airport Services Limited भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- २४७
पदाचे नाव आणि पदसंख्या :
क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
१. | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | ०२ |
२. | ड्युटी ऑफिसर | ०७ |
३. | ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर | ०६ |
४. | ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल | ०७ |
५. | कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह | ४७ |
६. | रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह | १२ |
७. | युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर | १७ |
८. | हॅन्डीमॅन | ११९ |
९. | हॅन्डीवूमन | ३० |
एकूण | २४७ |
शैक्षणिक पात्रता AIASL Recruitment भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | > पदवीधर सोबत १८ वर्षे अनुभव किंवा > MBA सोबत १५ वर्षे अनुभव |
ड्युटी ऑफिसर | > पदवीधर सोबत १२ वर्षे अनुभव |
ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर | > पदवीधर सोबत ०९ वर्षे अनुभव किंवा > MBA सोबत ०६ वर्षे अनुभव |
ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल | > इंजिनीरिंग पदवीधर Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering |
कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह | > पदवीधर > कॉम्पुटरचे ज्ञान असणे आवश्यक > इंग्रजी लिहिता वाचता यायला हवे |
रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह | > डिप्लोमा किंवा ITI > Valid HMV License |
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर | > १० वी पास > Valid HMV License |
हॅन्डीमॅन | > १० वी पास > इंग्रजी लिहिता वाचता यायला हवे |
हॅन्डीवूमन | > १० वी पास > इंग्रजी लिहिता वाचता यायला हवे |
AIASL Recruitment भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | ५५ वर्षे |
ड्युटी ऑफिसर | ५० वर्षे |
ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर | ३५ वर्षे |
ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल | २८ वर्षे |
कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह | २८ वर्षे |
रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह | २८ वर्षे |
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर | २८ वर्षे |
हॅन्डीमॅन | २८ वर्षे |
हॅन्डीवूमन | २८ वर्षे |