BMC License Inspector Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “License Inspector“ पदांसाठी एकूण 118 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is BMC :
बृहन्मुंबई महानगरपालिका ही मुंबई शहराला म्हणजेच महाराष्ट्राच्या राजधानीला सोबतच भारत देशाच्या आर्थिक राजधानीला नियंत्रणामध्ये ठेवते. बृहन्मुंबई महानगरपालिका हि भारत देशातील सर्वात शीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकाची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ च्या अंतर्गत करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकाची स्थापना मुंबई शहराच्या सोयी सुविधा वाढवण्याच्या हिशोबाने करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील मोठ्या आणि श्रीमंत महानगरपालिकांमधील एक महानगरपालिका आहे. सन १८८९ साली स्थपन झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकाचे कामकाज आजही सुरळीतपणे सुरु आहे.