CLW Railway Vacancy 2024: चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “अप्रेन्टिस [ प्रशिक्षणार्थी ]” पदांसाठी एकूण ४९२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखेआधी अर्ज करणे गरजेचे आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखेनंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स बद्दल थोडक्यात माहिती :
चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स ही कार्यशाळा बंगाल राज्यात स्थित आहे. चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. सन १९५० साली या कारखान्याची स्थापना झाली. तेव्हा या कारखान्याला स्वातंत्र्य सेनानी चित्तरंजन दास यांचे नाव देण्यात आले. सुरवातीच्या काळात या कारखान्यामध्ये कोळश्यावर चालणाऱ्या रेल्वेचे इंजिन बनवले जायचे, परंतु आजच्या घडीला येथे विजेवर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती केली जाते. चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स या कार्यशाळेचा उल्लेख जगातील मोठमोठ्या रेल्वे इंजिन निर्मिती केंद्रामध्ये केला जातो.
CLW Railway Vacancy 2024
चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स भरतीसंबंधी महत्वाची माहिती :