Indian Coast Guard Recruitment 2024
Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दल यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Navik, Yantrik“ पदासाठी एकूण 320 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Indian Coast Guard :
भारतीय तटरक्षक दल हा भारतीय सैन्याचाच भाग आहे. विशिष्ट भॊगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट सेना तयार केली जाते. भारतीय किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे काम भारतीय तटरक्षक दलाकडे असते. भारतीय किनारपट्टीपासून १२ सागरी मैलापर्यंतची सुरक्षा भारतीय तटरक्षक दलाकडे असते. १८ ऑगस्ट १९७८ रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. भारत देशात १ फेब्रुवारी हा दिवस तटरक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.