Lonavala Sahakari Bank Bharti
Lonavala Sahakari Bank Bharti : लोणावळा सहकारी बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Chief Executive Officer, Branch Manager / Branch Officer, Clerk“ पदांसाठी एकूण 16 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Lonavala Sahakari Bank :
लोणावळा सहकारी बँकैची स्थापना १९९९ साली करण्यात आली. लोणावळा शहरात प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सुविधा पोचवण्याचे मोलाचे काम लोणावळा सहकारी बँक करत आहे. लोणावळा शहरात या बँकेच्या एकूण ०७ शाखा आहेत, तसेच ५५० कोटी पेक्षा जास्त पैशाचा व्यापार या बँकेने केला आहे. लोणावळा शहरात या बँकेचे ०३ ATM सुद्धा आहेत. अशा या लोणावळा सहकारी बँकेत नोकरीची चांगली संधी चालून आली आहे, याचा सर्वानी पुरेपूर वापर करून एक चांगली बँकेची नोकरी आपली करून घ्यावी.