Mazagaon Dock Apprentice Recruitment 2024
Mazagaon Dock Apprentice Recruitment 2024 : माझगांव डॉक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Apprentice” पदासाठी एकूण 518 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Mazagaon Dock :
माझगांव डॉकचा इतिहास फार जुना आहे, १८ व्या शतकात माझगांव येथे बंदराची निर्मिती झाली. सुरवातीच्या काळात ब्रिटिशांनी आणि नंतर भारतीय नौसेनेने देखील याचा वापर केला. १९३४ साली माझगांव डॉकचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रूपांतरण झाले. नंतर १९६० साली जेव्हा सरकारकडे याचे हस्तांतरण झाले त्यानंतर माझगांव डॉकचा वापर मुख्य कारणाने भारतीय नौसेनेसाठी युद्धनौका आणि संबंधित सामग्री बनवण्यासाठी करण्यात आला. १९६० पासून येथे सुमारे ८०० पेक्षा जास्त जहाजे आणि २५ पेक्षा जास्त युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली.