NMDC Recruitment 2024
NMDC Recruitment 2024 : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Apprentice” पदासाठी एकूण 197 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाईल, 01 जुलै 2024 पासून 09 जुलै 2024 पर्यंत विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जातील.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the NMDC :
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [ NMDC ] ही भारत सरकारची कंपनी आहे. प्रत्येक प्रकारच्या खनिजाची देशभरात शोध करण्याचे काम ही संस्था करत असते. आजपासून ६६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९५८ साली राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ या संस्थेची स्थापना करण्यात आली. तेलंगणा राज्याच्या राजधानी हैदराबाद येथे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ या संस्थेमध्ये सुमारे ६००० कर्मचारी कार्यरत आहेत.