SEBI Grade A Notification 2024
SEBI Grade A Notification 2024 : सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Grade A Officer” पदासाठी एकूण 97 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the SEBI :
सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. १९८८ साली सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. नंतर १९९२ मध्ये ही संस्था स्वायत्त संस्था बनली. सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय मुंबई शहरात स्थित आहे. सुमारे १००० कर्मचारी या संस्थेमध्ये कार्यरत आहेत.
SEBI Grade A Notification 2024
सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 97
पदाचे नाव आणि पदसंख्या : Grade A Officer
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
General | 62 |
Legal | 05 |
IT | 24 |
Research | 02 |
Official Language | 02 |
Engineering [ Electrical ] | 02 |
एकूण | 97 |