SSC JE Notification 2024
SSC JE Notification 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन [ SSC ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ अभियंता [ Junior Engineer ]” पदांसाठी एकूण ९६८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
कर्मचारी निवड आयोग या संस्थेच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेमधून मंत्रालयात आणि भारत सरकारच्या विविध ऑफिसेस मध्ये कर्मचारी निवडले जातात. ०४ नोव्हेंबर १९७५ साली कर्मचारी निवड आयोग या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९७७ साली सबॉर्डिनेट सर्व्हिस कमिशन या संस्थेचे नाव बदलून कर्मचारी निवड आयोग करण्यात आले. कर्मचारी निवड आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये घेतल्या जात नाहीत तर इतर प्रादेशिक भाषांमध्ये पण घेतल्या जातात.
SSC JE Notification 2024
SSC JE Notification भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ९६८
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
कनिष्ठ अभियंता [ Civil ] | ७८८ |
कनिष्ठ अभियंता [ Mechanical ] | १५ |
कनिष्ठ अभियंता [ Electrical ] | १२८ |
कनिष्ठ अभियंता [ Electrical & Mechanical ] | ३७ |
एकूण | ९६८ |
SSC JE Notification शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कनिष्ठ अभियंता [ Civil ] | सिव्हिल इंजिनीरिंग डिग्री / सिव्हिल इंजिनीरिंग डिप्लोमा ०२ वर्षे अनुभव |
कनिष्ठ अभियंता [ Mechanical ] | मेकॅनिकल इंजिनीरिंग डिग्री किंवा मेकॅनिकल इंजिनीरिंग डिप्लोमा |
कनिष्ठ अभियंता [ Electrical ] | इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग डिग्री किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग डिप्लोमा |
कनिष्ठ अभियंता [ Electrical & Mechanical ] | इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनीरिंग डिग्री किंवा इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनीरिंग डिप्लोमा आणि ०२ वर्षे अनुभव |
SSC JE Notification वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
कनिष्ठ अभियंता [ Civil ] | ३० वर्षे |
कनिष्ठ अभियंता [ Mechanical ] | ३० वर्षे |
कनिष्ठ अभियंता [ Electrical ] | ३० वर्षे |
कनिष्ठ अभियंता [ Electrical & Mechanical ] | ३० वर्षे |
Age Relaxation as per Category :
SSC JE Notification पगार :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|
कनिष्ठ अभियंता [ Civil ] | ₹ ४०,००० ते ₹ ४५,००० |
कनिष्ठ अभियंता [ Mechanical ] | ₹ ४०,००० ते ₹ ४५,००० |
कनिष्ठ अभियंता [ Electrical ] | ₹ ४०,००० ते ₹ ४५,००० |
कनिष्ठ अभियंता [ Electrical & Mechanical ] | ₹ ४०,००० ते ₹ ४५,००० |
शुल्क :
पदाचे नाव | SC / ST / PwBD / Female | अन्यसर्व |
---|---|---|
कनिष्ठ अभियंता [ Civil ] | फी नाही | ₹ १०० /- |
कनिष्ठ अभियंता [ Mechanical ] | फी नाही | ₹ १०० /- |
कनिष्ठ अभियंता [ Electrical ] | फी नाही | ₹ १०० /- |
कनिष्ठ अभियंता [ Electrical & Mechanical ] | फी नाही | ₹ १०० /- |