UCO Bank Recruitment 2024
UCO Bank Recruitment 2024 : युको बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Apprentice” पदासाठी एकूण 544 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the UCO Bank :
युको बँक ही एक सरकारी बँक आहे. भारत सरकारच्या मालकीच्या एकूण १२ बँका आहेत. ०६ जानेवारी १९४३ साली युको बँकेची स्थापना करण्यात आली. गेल्या ८१ वर्षांपासून भारतीयांना अविरत बँकिंग सुविधा पुरवण्याचे काम या बँकेने केले आहे. युको बँकेच्या भारतात सुमारे ४००० शाखा कार्यरत आहेत, आणि २५०० पेक्षा जास्त ATM युनिट्स कार्यरत आहेत. युको बँकेचा व्यवसाय फक्त भारतातच सिमीत नसून परदेशातही यांच्या शाखा आहेत. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे युको बँकेचे मुख्यालय आहे.