Bank of Baroda Recruitment 2024
Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बरोडा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Manager, Analyst“ पदासाठी एकूण 168 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Bank of Baroda :
बँक ऑफ बरोडा या बँकेची स्थापना २० जुलै १९०८ रोजी महाराज सयाजीराव गायकवाड III यांनी केली. बँक ऑफ बरोडा या बँकेचे राष्ट्रीयकरण १९६९ साली अजून १३ बँकांसोबत करण्यात आले. आजच्या घडीला बँक ऑफ बरोडा ही सरकारी बँक आहे, भारत देशातील मोठ्या ०३ सरकारी बँकांपैकी बँक ऑफ बरोडा ही एक बँक आहे. बँक ऑफ बरोडा या बँकेचे मुख्यालय वडोदरा या शहरात गुजरात राज्यात आहे. बँक ऑफ बरोडा चा व्यापार फक्त भारत देशापर्यंत मर्यादित नसून इतर देशांमध्ये देखील ही बँक व्यापार करते. १९५३ साली बँक ऑफ बरोडा या बँकेची पहिली विदेशी शाखा केनिया आणि युगांडा या देशामध्ये सुरु झाली.