Central Bank of India Recruitment 2024
Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Faculty, Office Assistant, Attender, Watchmen/ Gardner” पदांसाठी एकूण 10 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Central Bank of India :
सेंट्रल बँक ऑफ इंडिया हि भारत सरकारच्या मालकीची बँक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना २१ डिसेंबर १९११ साली सोराबजी पोचखानवाला यांनी केली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण १९६९ अली करण्यात आले. बँकेच्या स्थापनेपासून आता पर्यंतच्या १०० वर्ष पेक्षा अधिक काळात सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेने अनेक चढ उतार पहिले आहेत, अनेक संकटाना सामोरे गेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया हि भारत सरकारच्या १२ सरकारी मालकीच्या बँकांपैकी एक बँक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बॅंकेजचे भारतभर ४६०० पेक्षा जास्त बँक शाखा आणि ३६०० पेक्षा जास्त बँक ATM कार्यरत आहेत, सोबत ३२,५०० पेक्षा जास्त कर्मचारी या बँकेत काम करत आहेत.