Konkan Railway Recruitment 2024
Konkan Railway Recruitment 2024 : कोंकण रेल्वे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “AEE, Assistant“ पदांसाठी एकूण ४२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. मुलाखत पदानुसार ०५ जून २०२४ पासून २१ जून २०२४ पर्यंत घेतली जाईल. उमेदवारांनी पदानुसार मुलाखतीला हजर राहावे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Konkan Railway :
कोंकण रेल्वे विभाग हा भारत देशातील १९ रेल्वे विभागांपैकी एक आहे. कोंकण रेल्वे विभागाचे मुख्यालय सीबीडी बेलापूर येथे आहे. १९९३ साली कोंकण रेल्वे विभागाची पहिली ट्रेन धावली होती. महाराष्ट्रातील रोहा या स्टेशन पासून कर्नाटक राज्यातील ठोकूर स्टेशन पर्यंत कोंकण रेल्वे विभाग पसरलेला आहे. कोंकण रेल्वे विभागामध्ये एकूण ६९ रेल्वे स्थानक येतात. ७५० किमी पेक्षा जास्त पसरलेला कोंकण रेल्वे विभाग महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक या राज्यांना जोडतो. कोंकण रेल्वे विभागाने ककोंकण रेल्वेचे विद्युतीकरण केलेले आहे, म्हणजेच विद्युतीकरणाच्या बाबतीत कोंकण रेल्वे १००% विद्युतीकरण झालेले आहे.
Konkan Railway Recruitment 2024
कोंकण रेल्वे भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 42
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
AEE / Contract | 03 |
Sr. Technical Assistant / Electrical | 03 |
Jr. Technical Assistant / Electrical | 15 |
Jr. Technical Assistant / Civil | 04 |
Design Assistant / Electrical | 02 |
Technical Assistant / Electrical | 15 |
एकूण | 42 |