SSC CHSL 2024
SSC CHSL 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Lower Divisional Clerk , Data Entry Operator” पदांसाठी एकूण ३७१२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is SSC CHSL :
कर्मचारी निवड आयोग या संस्थेच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेमधून मंत्रालयात आणि भारत सरकारच्या विविध ऑफिसेस मध्ये कर्मचारी निवडले जातात. Staff Selection Commission CHSL [ Combined Higher Secondary Level ] हि कर्मचारी निवास आयोग अंतर्गत १२ वी पास या आधारावर होणारी एक परीक्षा आहे. ०४ नोव्हेंबर १९७५ साली कर्मचारी निवड आयोग या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९७७ साली सबॉर्डिनेट सर्व्हिस कमिशन या संस्थेचे नाव बदलून कर्मचारी निवड आयोग करण्यात आले. कर्मचारी निवड आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये घेतल्या जात नाहीत तर इतर प्रादेशिक भाषांमध्ये पण घेतल्या जातात.
SSC CHSL 2024
Staff Selection Commission CHSL भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ३७१२
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant | – |
Data Entry Operator | – |
एकूण | ३७१२ |
How many vacancies are there in SSC CHSL 2024 ?
There are 3712 vacancies available in SSC CHSL 2024. 3712 vacancies are for both post combined.
शैक्षणिक पात्रता SSC CHSL भरती :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant | > 12 वी पास |
Data Entry Operator | > 12 वी पास विज्ञान शाखा गणित विषय आवश्यक किंवा समतुल्य |
SSC CHSL Age Limit :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant | १८ ते २७ वर्षे |
Data Entry Operator | १८ ते २७ वर्षे |
SSC CHSL Salary :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|
Lower Divisional Clerk / Junior Secretariat Assistant | ₹ 19,900 ते ₹ 63,200 |
Data Entry Operator | ₹ 25,500 ते ₹ 81,100 |